महिला दिनानिमित्त मालाडमध्ये साडी वाटपाचा उपक्रम
आयेशा फाउंडेशन ट्रस्ट व शेठ एन. के. टी. ट्रस्टचा संयुक्त पुढाकार
मालाड : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेशा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने तसेच शेठ एन. के. टी. ट्रस्टच्या सहकार्याने मालाड येथे साडी व धान्य वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील अनेक गरजू महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजमा खान होत्या. यावेळी आसिम खान तसेच परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. महिलांचा सन्मान व त्यांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.