संजय राऊतांनी घेतला मंत्री गिरीश महाजनांच्या त्या वक्तव्याचा समाचार; म्हणाले ..

0

मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणुका जिंकणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे व्यक्त केला. यांनतर संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले. गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही. काहीही बोलावं आणि काहीही करावं. स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्यांनी पाहावं अशी टीका संजय राऊतांनी मंत्री महाजनांवर केली.

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर गिरीश महाजन यांनी टोला लगावला होता. उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही. त्यांना एकत्र यायचंय, एकत्र यावं. लोकशाही आहे. कुणीही एकत्र येऊ शकतात, कुणीही वेगळे होऊ शकतात. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या एखाद्या ठिकाणी तरी त्यांनी निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत संजय राऊत यांना मंत्री महाजन यांनी आव्हान दिलं. आता खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय.

राऊत गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “मुळात म्हणजे गिरीश महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळतंय हे त्यांनी पाहवे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांचे काय हाल असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू हे राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. चोर दरोडेखोर हे जे फडणवीसांच्या भोवती आहेत, त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल”, असे त्यांनी म्हटले.

तसेच “आज तुमची मस्ती आहे ती लुटलेल्या पैशांची () आहे, सत्तेची मस्ती आहे. तुम्ही प्रमोद महाजन नाही तर, तुम्ही जळगावचे गिरीश महाजन आहात. आत्मचिंतन करा आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला. फार आमच्या नादाला लागू नका, सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात” असे म्हणत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवरही निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.