संजय मधुकर मुळे यांचा स्पीकर ऑफ द इयर म्हणून गौरव
मुंबई दि. (प्रतिनिधी ) : द एक्सलंसीआयकॉनिक अवॉर्ड आणि फाव अँड फेअर्स यांच्यातर्फ़े आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक श्री. संजय मधुकर मुळे यांचा “बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अरबाज खान यांनी श्री. संजय मुळे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. श्री. मुळे यांनी “नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ थ्रु इनडिव्ह्युज्वल कॉन्ट्रब्युशन” या विषयावर आपले विचार मांडले होते. या भाषणास बेस्ट स्पीच तर स्पीकर ऑफ द इयर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
यापूर्वी द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्ड तर्फे श्री. मुळे यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.