सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन चालणारे इगतपुरीतील व्यक्तिमत्त्व व नेतृत्व म्हणजे अॅड.संदिपभाऊ गुळवे
इगतपुरी |
इगतपुरी तालुक्यात जनसामान्यांपर्यंत पोहचलेले नाव म्हणजे कै.लोकनेते स्व.गोपाळराव गुळवे उर्फ दादासाहेब यांचे सुपूत्र म्हणजे सर्वांचे ‘आदरणीय भाऊ’ अॅड.संदिपभाऊ गुळवे यांचा ११ सप्टेंबर रोजी वाढदिवस तालुक्यात विविध संस्था व संघटनांकडून उत्फुर्तपणे साजरा केला जातो त्याचे कारण म्हणजे संदिपभाऊचे सर्वांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध राजकीय पक्ष बाजूला ठेऊन पक्षाबाहेर भाऊंचे असंख्य चाहते, मित्र परिवार, कार्यकर्ते इगतपुरी व नाशिक जिल्हात तसेच उत्तर महाराष्ट्रात आहे
त्याचे कारण संदिपभाऊंचा सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रात असलेला सक्रिय वावर त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संदिपभाऊंचे सर्वांशी असलेले मैत्रीपूर्ण व सौहार्दपूर्ण संबंध संदिपभाऊंनी कै.लोकनेते स्व.दादासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज अनेक क्षेत्रांत व विविध संघटनांवर तालूका ते जिल्हापातळीवर भाऊंच असलेल प्रगतीशील नेतृत्व भाऊंना विविध कामासाठी भेटायला लोक व कार्यकर्ते येत असतात संदिपभाऊंचा दिवस सकाळी सातला चालू होतो तर रात्री जनसामान्यांची, शेतकरी, शेतमजूर, शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक – सेवक वर्गाची कामेसंपेपर्यत भाऊ थांबत नाहीत सतत कामात व्यस्त असतात घरी कामानिमित्त भेटायला येणा-या प्रत्येकाला सौजन्यपूर्ण वागणूक आणि काहीतरी देण्याचा प्रयत्न संदिपभाऊंचा नेहमी असतो यातून तालुक्यात असंख्य कार्यकर्त्यांची फळी भाऊंनी निर्माण केली आहे.
इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात शिक्षणांची गंगा खेड्यापाड्यापर्यत पोहचविण्यासाठी स्व.लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी केलेल कार्य संदिपभाऊ पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत त्या शिवाय जिल्हा परिषद, जिल्हा बँकेवर, घोटी बाजार समिती, जिल्हा खरेदी-विक्रीसंघ या सारख्या असंख्य संस्था व संघटनेवर संदिपभाऊंनी नेतृत्व केले आहे आणि यापुढेही करीत राहतील. इगतपुरी तालुक्याचा उच्च शिक्षणात विकास व्हावा यासाठी संदिपभाऊ सन २०२२ पासून ‘मविप्र’ संस्थेवर इगतपुरी तालूका संचालक म्हणून कार्य करीत आहे या माध्यमातून तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात असंख्य शैक्षणिक उपक्रम व योजना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे यांना सोबत घेऊन व ‘मविप्र’ सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात आहेत आज महाविद्यालयाचा पुर्ण कायापालट झालेला आहे संदिपभाऊंचा एकच ध्यास आहे तो म्हणजे इगतपुरी तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन महाराष्ट्रात हा तालूका विकासाचा एक माॅडेल तयार व्हावे. अशा प्रकारे संदिपभाऊंना भावी आयुष्यात विविध क्षेत्रात यश मिळो तालुक्याचे नव्हे तर जिल्हाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो ही आई जंगदबे व छत्रपती शिवाजीमहाराजांपुढे आम्ही प्रार्थना करतो.