गोवर्धने महाविद्यालयात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त अभिवादन
इगतपुरी | दैनिक जळगांव वृत्तसेवा प्रतिनिधी भागीरथ आतकरी
बोरटेंभे येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे योगदान अभूतपूर्व असून त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात तसेच कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिक महत्वपूर्ण योगदान दिले असून ते अष्टपैलू साहित्यिक, कलावंत होते. त्यांनी दलित साहित्याचा पाया रचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा, लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे असे या प्रसंगी प्रतिपादन केले. या अभिवादन प्रसंगी कान्हेय्या चौरसिया, गंगाधर कोल्हे, मनोज मगर, अर्चना धोंगडे, मोहनी गवते, संजय पाटील, सुनील जाधव, महेश उगले, अमोल टिळे आदी उपस्थित होते.
गोवर्धने महाविद्यालयात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना जयंतीनिमित्त अभिवादन करताना प्राचार्य डॉ.किरण रकिबे व विद्यार्थी – सेवकवर्ग