सागर पार्कवर युवतींची भव्य दहीहंडी

0

भव्य व्यासपिठ; तरूणींच्या मनोर-यासाठी स्वतंत्र व्यवस्था; पुणेरी ढोल-ताशाच्या गजर घुमणार

जळगाव | भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) वर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असून एकूण ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे.

पुणेरी ढोल-ताशाच्या गजर घुमणार…

गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. तसेच शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी संख्या नागरिक नागरिक सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

उत्सवासाठी ही आहेत गोपिकांची अकरा पथके

गोपिंकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके येणार आहेत. या पथकामध्ये किडस् गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. या पथकांचा समावेश आहे.

यांची असेल प्रमुख उपस्थिती

खासदार अॅड. उज्वल निकम,खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. इंद्राणी मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.