वेळ संघर्षाचा…सुप्रिया सुळे यांची रोहिणी खडसे यांच्याबद्दलची भावनिक पोस्ट

0

पुण्यात रेव्ह पार्टी करताना आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांनी वकीलांचा कोट चढवून न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या पतीला अडकवले असल्याचा आरोप केला आहे. रोहिणी खडसे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट केली आहे.

पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना गेल्या आठवड्यात धाड टाकून अटक केली आहे. प्रांजल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.या संदर्भात पतीला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वकील म्हणून पतीची केस लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आपल्या पतीला ट्रॅप लावून अडकवण्यात आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांच्याबद्दल भावनिक पोस्ट केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहीणी खडसे यांना या न्यायालयीन लढाईत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या एक्स हँडलवरुन सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रोहिणी खडसे यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिली आहे ती अशी, ‘वेळ संघर्षाची असो की प्रत्यक्ष लढण्याची ! मी सदैव सोबत…! असे म्हटले आहे.

पोलिसांनी पाळत ठेवून हा सगळा प्रकार केला
पुणे रेव्ह पार्टीप्रकरणात आपले पती प्रांजल खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केला आहे तो अंमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत केलेला आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने तपास होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये फोनमधील व्हिडिओ आणि इतर गोष्टींचा या केसशी काही संबंध येत नाही असेही रोहीणी खडसे यांनी म्हटले होते. पोलिसांनी पाळत ठेवून हा सगळा प्रकार केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला होता. मात्र यावर पाळत ठेवणे हा आमचा हेतू नव्हता असा खुलासा पोलिसांनी केला आहे. पुण्यात रोहिणी खडसे यांच्या घरी एकनाथ खडसे यांच्या पत्रकार परिषदेत आठ ते दहा पोलिसांनी शिरकाव केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी नुकताच केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.