रोहिणी खडसे व कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

0

जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याच्याकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रोहिणी खडसे यांचं देखील नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहिणी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पांडुरंग नाफडे याच्या पत्नीने केला आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप देखील नाफडे यांच्या पत्नीने केला आहे.

पांडुरंग नाफडे यांची पत्नी सीमा नाफाडे यांनी अखेर याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे सीमा नाफाडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सीमा नाफडे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.