एकनाथ खडसेंच्या मुलीच्या अडचणीत वाढ; रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होणार?
जळगाव । पुण्यातील खराडी भागात पार्टी करताना पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि अॅड. रोहिणी खडसे यांचे पती डॅा. प्राजंल खेवलकरला अटक केली. मात्र यांनतर त्यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करण्यात येत आहे. या गुन्ह्यात खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो मिळून आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी पुराव्यांची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. पती प्रांजल खेवलकर यांना चुकीच्या प्रकरणात अडकवले गेले आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला होता.
तसेच योग्य वेळी उत्तर देईन, असं देखील त्या म्हणाल्या होत्या. याशिवाय पतीला वाचवण्यासाठी त्या थेट कोर्टात देखील पोहोचल्या. मात्र, खेलवकरांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
पतीला वाचविण्यासाठी धडपड पण….
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजले. या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॅा. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे धडपड करताना दिसत आहेत. त्यांनी या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कोठडीत जाऊन पतीसोबतही संवाद साधला. या काळात त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती.