अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

0

जळगाव । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास दोन वर्षांपासून दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. मात्र आता अनेक महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.पडताळणीमध्ये तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता, अशी टीका केली आहे.

रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत लिहिले की, “आताच्या क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे.

सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती, तेव्हा परिस्थिती काय होती?” असा सवाल त्यांनी केला.

आकडेवारी केली सादर
“लाडकी बहीण योजनेत सुरुवातीचे लाभार्थी २.५३ कोटी होते. सुरुवातीचे बजेट सुमारे ४५,००० कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी आता १,४८,६०,००० इतके शिल्लक राहिले आहेत. २०२६-२७ बजेटमध्ये यासाठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याचाच अर्थ संभाव्य अपात्र महिला सुमारे १.०५ कोटी आहेत. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले, शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता,” असा आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.