पुणे : पुण्यातील खराडीमधील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसे यांच्या पतीसह पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले. आता २४ तासानंतर रोहिणी खडसे यांची याबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे.
रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावर पोस्ट पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे कि की, “कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर आहे आणि योग्य वेळी सत्य बाहेर येईल.” अशी रोहिणी खडसे यांनी दिली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट आरोपांवर भाष्य टाळले आहे. तसेच, पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावरही छापा टाकला असून, तिथून लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे.
एकनाथ खडसेंचा राजकीय षडयंत्राचा दावा
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जर माझ्या जावयाने रेव्ह पार्टी आयोजित केली असेल किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर मी त्याचे समर्थन करणार नाही. पण ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे का, याची चौकशी व्हायला हवी. खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध टीका केली होती, आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने त्यांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे.