रेव्ह पार्टीत जावयाला अटक; नाथाभाऊंना व्यक्त केली मोठी शंका

0

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांच्या जावयाला रंगेहात पकडल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकाणावर कालच नाथाभाऊंनी भाष्य केले. आज एकनाथ खडसे हे पुण्यात असून त्यांनी मोठी शंका व्यक्त केलीये.

या रेव्ह पार्टी प्रकरणात बोलताना खडसे म्हणाले की, मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, परंतु पोलीस यंत्रणेकडून माहिती कशी दिली जाते, एखाद्याचे मोबाईलमधील व्हिडीओ बाहेर कसे येत आहेत. पोलिसांना काय अधिकार आहेत हे व्हिडीओ माध्यमांना देण्याचा.

ड्रग्ज घेतल्याचा रिपोर्ट आला नाही, अल्कहोल घेतल्याचा पुरवा आला आहे. काय काळबेर सुरू आहे, एकदंरीत प्रकरण पाहता काही तरी काळबेरं दिसत आहे. माझ्या जावयाने ड्रग्ज आयुष्यात पाहिला नाही. पोलिस या प्रकरणात जेवढी तत्परता दाखवत आहेत तेवढीच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवत नाहीत, असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. रेव्ह पार्टीप्रकरणात जावयाची चुक आसेल तर पाठीशी घालणार नाही. पोलिस तपास करत आहेत, तपासाची जे निष्कर्ष येतील त्यानंतर मी बोलणार आहे.

पोलिस म्हणतात अल्कहोलचा रिपोर्ट आला ड्रग्जचा रिपोर्ट आला नाही. पोर्षे प्रकरणात रिपोर्टमध्ये फेरफार झाला होता, त्यामुळे ससूनमध्ये फेरफार होतो. एकुणच सर्व प्रकरणात शंका येते, असेही आता थेट एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे यांची आज पुणे आयुक्तांसोबत मिटिंग होती. मात्र, ही मिटिंग अचानक रद्द करण्यात आली, ज्यानंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. यासोबतच प्रांजल खेवलकर याच्या अटकेनंतर रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे पुण्यात तळ ठोकून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.