बापरे! चोपड्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचला चेहरा

0

चोपडा !  जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संशियत आरोपी मुकेश पूना बारेलास (२२) याला अटक केली आहे.

याबाबत असे की, चोपडा तालुक्यात पीडितेचे वडील भाडेतत्त्वावर शेती करत होते. हे अादिवासी कुटुंब विरवाडे गावात राहत होते. त्यामुळे ते आणि त्यांच्या मुली सायंकाळपर्यंत शेतात निदंणीचे काम करत होते. घरात पीडिता ही सर्वात मोठी असून तिच्या पाठीवर लहान चार बहिणी आहेत. सायंकाळी सर्व जण पायी रस्त्याने घराकडे जात होते.

याच दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपीने मोठ्या बारावर्षीय बहिणीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले. तिच्यासोबतच्या तीन लहान बहिणींनी हे पाहिल्यानंतर सर्व हकीकत विरवाडे गावकऱ्यांना सांगितली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मारेकऱ्याचा तपास सुरू केला. चोपडा-आडगाव रस्त्यावर तो पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे घटनास्थळी दाखल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.