महाराष्ट्रावर संकटांचा कहर, हवामान विभागाकडून मोठा इशारा

0

राज्यात मागील काही दिवस पावसाने पाठ फिरवली असता आता मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. अनेक रस्ते जलमय झाली आहेत. रात्रभर जोरदार पाऊस सुरू असून सकाळीही मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट दिला आहे. 16 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्हात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात ऑरेंज अलर्ट. बाकी राज्यातील इतर ठिकाणी थेट येलो अलर्ट देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथील संततधार पाऊस सुरू असून आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून ठाणे, मुंंबईमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी फार महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे शक्यतो टाळाले. सकाळप्रमाणेच दुपारी आणि सायंकाळीही पावसाचा जोरदार वाढण्याची दाट शक्यता आहे.

दिवा, डोंबिवली, कल्याण, कल्याण ग्रामीण भागात दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात पाणी देखील साचले आहे. धुळे शहरात झालेल्या दीड तासाच्या पावसानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रुग्णांच्या आणि रुग्ण नातेवाईकांचे मोठे हाल होत होते. जळगावच्या पारोळा तालुक्यात शेळावे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने चिखली नदीला पूर आलाय.

पुराच्या पाण्यामध्ये दोन गुरांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. घरांमध्ये पुराचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुराच्या पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंब बेघर झाली. शेळावे खुर्द व शेळावे बु.दोन्ही गावांचे नदी लगत वस्तीमध्ये अचानक चिखली नदीला पुर आल्याने राहत्या घरात पाणी शिरले. या घटनेची दखल घेऊन व ग्राम महसूल अधिकारी , मंडळ अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले.

गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली. जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे 98 टक्के भरला भरले होते. काही भागात हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पुढील काही तासात अतिमुसधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये.

Leave A Reply

Your email address will not be published.