आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी

0

पुणे । राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून याच दरम्यान हवामान खात्याने आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील ९ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आज संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.