मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पुढील 5 दिवस धो धो पावसाचा अंदाज
मुंबई । वेळेआधी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी मान्सूनने मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रीय झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. साधारणपणे १५ ते १६ जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेनुसारच मौसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला. याचबरोबर झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे राज्यभरात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज काही ठिकाणी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.