जळगावसह राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा ; वाचा पुढील चार दिवसाचा हवामान अंदाज

0

मुंबई । महाराष्ट्रावरील पावसाचं संकट कायम असून मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या खरिपाची पिके हातून गेली. आता यातच हवामान खात्यानं समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजेच जळगाव जिल्ह्याला देखील आज आणि उद्या विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान मध्यरात्री जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. हवामान पुढील काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण असेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला असून जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यता पुढील ४ दिवस राज्यात कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट, पाहा यादी

२२ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट –

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२३ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट –

धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२४ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट –

सोलापूर, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२५ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट –

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया,

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

Leave A Reply

Your email address will not be published.