राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढणार ; हवामान खात्याकडून आज या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी लावत आहे. मात्र उद्या शनिवार, 5 जुलैपासून राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या धर्तीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्याना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातील पावसाने ओढ दिला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे.
आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, साताऱ्यासाठी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.