महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट; हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट

0

मुंबई । सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी हवामान खात्याचं अंदाजानं शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून, हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्र, कच्छची खाडी आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात दहा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.या काळात वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किमी इतका प्रचंड असणार आहे. हा कमी दबाचा पट्टा पुढील काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा धोका वाढला आहे.

कोणत्या राज्यात होणार पाऊस?

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये पच्छिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात आधीच पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यातच आता पु्न्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, चिंता वाढली आहे,

दरम्यान, उद्या ४ ऑक्टोबरपासून जळगाव जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.