आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
जळगाव । महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान आगामी काही दिवसात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्याने आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला.
हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तसेच उद्या ८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच कोल्हापूर आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच तळ कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ असून, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचाही यात समावेश आहे.