रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीसाठी शासनाची मंजुरी ; किती मिळेल प्रति क्विंटल भाव?

0

जळगाव । रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नोंदणीचे आदेश दिले आहेत. अनेक दिवसांपासून ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. अखेर शासनाने ८ रोजी ज्वारी खरेदीचे आदेश काढाले आहेत.

शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी दोन हजार ते तेवीसशे रुपयाने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्याला ८०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे. ज्वारी खरेदीसाठी ३१ मे पर्यंत शनिवार सकाळी १० वाजेपासून नोंदणी सुरू राहील, कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.