आनंदाची बातमी ! रविवारपासून पुणे–रीवा एक्सप्रेस धावणार, भुसावळरांनाही होणार फायदा

0

भुसावळमार्गे पुण्याला जाण्यासाठी आणखी एक ट्रेन मिळाली आहे. पुणे ते रिवा या दरम्यान एक नवीन एक्सप्रेस ट्रेन उद्या 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. खास बाब म्हणजे ही गाडी भुसावळमार्गे धावेल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून या नव्या गाडीला झेंडा दाखवण्यात येईल.

रेल्वे प्रशासनाने ही नवीन ट्रेन सुरू करताना एक व्यापक दृष्टीकोन ठेवला आहे. पुणे आणि रिवा ही दोन्ही शहरे ऐतिहासिक वारसा, शैक्षणिक संस्था आणि धार्मिक महत्त्वामुळे ओळखली जातात. पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र आणि विविध तीर्थस्थानांसाठी प्रसिद्ध आहे, तर रिवा हे मध्यप्रदेशातील उदयोन्मुख पर्यटनस्थळ मानले जाते. त्यामुळे ही ट्रेन केवळ प्रवासाचे साधन न राहता, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध मजबूत करण्याचे माध्यम ठरणार आहे.

जाणून घ्या वेळापत्रक
ट्रेन क्र. 20151 पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल.
ट्रेन क्र. 20152 रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार –
दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना.

एक्सप्रेसची रचना कशी असेल?
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन, असे सरंचना असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.