कमी वयात उत्तम व्यवासायिक शरद व शुभम
इगतपुरी: काम कुठले ही असो मात्र त्यात एकनिष्ठ व करण्याची उमीद असली तर तो व्यवसाय यशस्वी होतो याचा ऊत्तम उदाहरणं दोन तरुणांचं आहे छोट्या मोठ्या उद्योगातून त्यांनी भरारी घेत पंचवटी अमृततुल्य उभारले आहे राष्ट्रीय महामार्गवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम दर्जाचा चहा देण्याचे काम हे दोन तरुण करत आहे रोजनदारीत काम न करता आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पंचवटी अमृततुल्य चे संचालक शरद घाटोळ, शुभम जाधव या युवा तरुण उद्योजक यांनी पंचवटी अमृततुल्य चहाचा व्यवसाय सुरु केला आणि वाडीवऱ्हे फाट्यावर आज नाशिक मुंबई ला जाणारे चहाप्रेमी इथं थांबा घेऊन हमखास चहाचा अस्वाद घेतात. अगदी कमी दरात प्रवाशांसाठी वाडीवरहे येथे पंचवटी अमृततुल्य ची स्थापना दोन वर्षापूर्वी या युवकाणी केली आहे. व्यवासाय कुठला ही असो पण त्याला मनःपूर्वक करण्याची उमीद आणि उत्सहा असला तर तो नक्की यशस्वी होतो त्यामुळे शरद घाटोळ व शुभम जाधव यांच कौतुक करण्याजोगे आहे कमी वयात उत्तम व्यवसायिक झाल्याच एक उत्तम उदाहरणं आहे.