चोपड्याचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना ह्दयविकाराचा झटका

0

जळगाव । चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज सकाळी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ त्यांना वाहनात हृदयविकाराचा झटका आला. घटनेनंतर तातडीने कार्यकर्त्यांनी त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. प्रभाकर सोनवणे हे शिवसेना ठाकरे गटाचे चोपडा मतदारसंघाचे उमेदवार असून ठाकरे गटाच्या शेवटच्या यादीत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाकर सोनवणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रभाकर आप्पा सोनवणे यांची तब्येत आता चांगली असून ते लवकरच बरे होऊन प्रचारामध्ये सहभागी होतील, अशी माहिती प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव दिनेश सोनवणे बोलताना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.