राजकीय वर्तुळातून मोठी बातमी ! अजितदादांच्या बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई । मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांचे नेतेच महायुतीमधील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार कैलास पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कैलास पाटील यांनी पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले. एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान पाटील यांची शिंदे गटात प्रवेश केला. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कैलास पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना कैलास पाटील यांनी म्हटलं की, आजचा दिवस माझा सोन्याचा दिवसं आहे. 1987 साली मला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी तालुका प्रमुख म्हणून संधी दिली. त्यानंतर 1997 साली मी उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केले. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यातला शिवसैनिक जिवंत ठेवला याचा अभिमान वाटतो. 1987 ला काम सुरु केले आणि 1997 ला शिवसेनेचा पहिला आमदार झालो. शिवसेना सोडून मी चूक केली, याचा मला पश्चाताप झाला. मी आता कोणत्याही अटीशिवाय पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष होतो, मात्र आता मी शिवसेनेत आलो आहे, असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.