नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा

0

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी आले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधी आघाडीच्या इंडिया ब्लॉकला 234 जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहे. अशात ते बहुमताच्या (272) अंकाच्या खूप मागे आहे.

2014 च्या निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली 282 जागा जिंकल्या आणि 2019 च्या निवडणुकीत 303 जागा जिंकून स्वबळावर बहुमत मिळवले. मात्र, यावेळी मित्रपक्षांना सामावून घेत एनडीएला बहुमत मिळवण्यात यश आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांना सुपूर्द केला आहे. स्वतः राष्ट्रपती यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.