राम शिंदे यांच्यासह भागीरथ आतकरी, किशोर देहाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत के पी जि महाविद्यालयात होणार पुरस्कार वितरण सोहळा
इगतपुरी | नाशिक जिल्हा मराठी पत्रकार पत्रकार संघ संलग्नित इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२५ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनामित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहे.
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात पत्रकार दिनाच्या निमित्ताने सकाळी ११ वा पत्रकार गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील तीन पत्रकारांना पुरस्कार घोषित करण्यात आलेले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरन करण्यात येणार आहे.
१) इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सर्वश्री किशोर देहाडे ( इगतपुरी, दैनिक अग्रलेख) २)इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राम शिंदे ( टाकेद, दै.सकाळ ) ३) त्याच प्रमाणे भगीरथ आतकरी ( घोटी, दै.लोकनामा ) यांना पत्रकारितेच्या कार्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. आज केपिजे महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमात पत्रकार बांधवांना महत्वाची आणि आनंदाची बातमी देखील मिळणार असल्याचे इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष
पुरुषोत्तम राठोड,नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी शरद मालुंजकर यांनी दिली आहे.