भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची सेनगाव शहरात भव्य सभा संपन्न
हिंगोली | हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी सेनगाव शहरात सभेला संबोधन केले यावेळी मंचावर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज उपस्थित होते
मध्यप्रदेशचे संघटन मंत्री जगदीश गंगा बी डी अंबल जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे के के शिंदे माजी आमदार रामराव वडकुते हिंगोली नगराध्यक्ष बाबाराव बांगर बि डी बांगर भाऊराव देशमुख सेनगाव तालुका अध्यक्ष भाजपा हिम्मत राठोड अजितदादा गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बांगर डॉक्टर कोरडे भाजपा नेते सतीश खाडे नगरसेवक सेनगाव अमोल तिडके व इतर पदाधिकारी भाजपा, राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना शिंदे गट पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांना तिसऱ्यांदा आमदार करून हायस्ट्रिक करायची असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आलेल्या महिला व सर्व नागरिकांना आव्हान करून आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना असो महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट दरात सवलत करून दिली शेतकऱ्यांसाठी शेतात लागणारे जवळपास सगळेच उपक्रम आमच्या सरकारने योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले व जवळपास सगळ्याच योजना आमच्या सरकारमध्ये यशस्वीरित्या चालवल्या व आमचे सरकार परत आले तर आम्ही पुढेही ह्या योजना ठेवणार याकरिता आपल्याला तानाजी मुटकुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आहे पंकजा मुंडे यांनी जनतेला भाषणाद्वारे सांगितले