पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या 20 तलवारीसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

0

जळगाव । पाचोरा शहरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका तरुणाकडून अवैध १८ तलवारी हस्तगत करत त्याला अटक करण्यात आली. एकूण 54 हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाई जप्त करण्यात आला असून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोलीस नाईक संदिप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांनी केली.

याबाबत असे की, पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात काही तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा येथील राहणारा सोहेल शेख तय्युच शेख (वय २४ वर्षे) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या एकूण १८ तलवारी जप्त करण्यात आल्या असून, काही तलवारी आधीच विकल्या गेल्याचेही त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.