विहिरीत काम करीत असताना कामगारासोबत घडलं विपरीत
पाचोरा (जळगाव) : विहिरीत दुरुस्तीच्या कामासाठी उतरलेल्या तरुण कामगाराला विजेचा जोरदार झटका बसला. यात झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथे १८ जूनला घडली. महावितरणच्या लोंबकळलेल्या विड्यात तारेला स्पर्श होऊन सदरची दुर्दैवी घटना घडली.
भडगाव येथील रहिवासी कैलास युवराज पाटील (वय ४७) असे मयत मजुरांचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतात विहीर दुरुस्तीचे काम करून कैलास परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान १८ जूनला देखील ते सकाळी पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाणे येथे दिघी शिवारात शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
विजेचा धक्का बसून फेकले गेलेल्या कैलास यांना तत्काळ पाचोरा (Pachora) रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मजुराच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची मागणी शासनाकडून केली आहे. तर हा मृत्यू महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांनी भरपाई द्यावी; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान महावितरणकडून २० हजाराचा धनादेश देण्यात आला.