जळगावच्या तरुणाला ऑनलाईन ठगांनी लावला ४ लाख ७२ हजार रूपयांचा चुना

0

जळगाव । आजकाल अनेक तरुण ऑनलाइन जॉब ऑफर्सच्या फसवणुकीचे शिकार होत आहेत. या फसवणुकीचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे. ज्यामध्ये जळगावच्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणाला ऑनलाईन ठगांनी तब्बल ४ लाख ७२ हजार रूपयांचा चुना लावला गेला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अशी झाली फसवणूक?
जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणार राहुल कृष्णा चौधरी (वय २६) हा वैद्यकीय शिक्षण घेत असून आहे. दरम्यान त्याला ७ ऑक्टोबरला टेलिग्रामवर एक मेसेज आल्यावर रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने मी प्राइस रनर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून चांगल्या कमाईचे ऑनलाइन जॉब पाहिजे असल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यांनतर जॉबवर ऑफर असून आठ हजारातच कामाला सुरूवात करता येईल, असे प्रलोभन देण्यात आल्यांनतर राहुलने ऑनलाइन पैसे भरले.

यानंतर दुसरी योजना सांगत नव्या सापळ्यात ओढले. यात लक्झरी प्रोडक्ट मिळाले असून ते मिळविण्यासाठी १५ हजार रूपये भरावयास सांगितले. ही रक्क्म देखील त्यांनी भरल्यानंतर ठगांनी राहुल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ९ हजार ८०० रूपये त्यांच्या खात्यावर पाठविले. नंतर १९ ऑक्टोबरला पुन्हा मेसेज पाठवत आमच्या वेबसाइटवर तुमच्यासाठी आणखी ऑफर आहे. म्हणून ३० हजार रूपये भरावे लागतील असे सांगितल्यावर राहुल याने पुन्हा ३० हजार रूपये भरून ऑनलाइन कामाला सुरूवात केली. असे करत वेळोवेळी एकूण ४ लाख ७२ हजार रूपयांची रक्कम राहुल याने पाठविली.

ती रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांची मागणी केल्याने फसवणूक झाल्याचे राहुलच्या लक्षात आले. यामुळे त्याने पैसे परत मागितले असता समोरच्याने पैसे परत न केल्याने चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.