नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
मुंबई । शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. कॅबिनेटमध्ये अनेक महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. परंतु, शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून नीलम गोऱ्हे यांना मान मिळाला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःहून माहिती दिली.
कॅबिनेट मंत्रीपदाची माहिती देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रत आलेली आहे. कॅबिनेट पदाचा दर्जा मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. महिलांना कॅबिनेट मंत्री पद मिळालेले आहे. पण शिवसेनेतील महिलेला कॅबिनेट मंत्रीपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे, त्याबद्दल मला याबाबत मला फार आनंद वाटतोय, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. काँग्रेसकडून जोगेंद्र कवाडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.