खान्देश केटरिंग असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

0

जळगाव । जळगाव येथील खान्देश केटरिंग असोसिएशनने येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रदेखील त्यांनी आ. भोळे यांना दिले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देत आहोत. तसेच, जळगाव शहरातील सर्व केटरिंग व्यावसायिक हे तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खान्देश केटरिंग असोसिएशनने दिले आहे. त्यावर अध्यक्ष सत्यनारायण जोशी व सचिव रतन सारस्वत यांच्या स्वाक्षरी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.