नाशिक महापालिकेत भाजपची मोठी कारवाई; महापौरांसह तब्बल ५४ नेत्यांची हकालपट्टी
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने माजी महापौरांसह तब्बल ५४ पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपाने अधिकाधिक यश मिळवण्यासाठी अनेक दुसर्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले आणि त्यांना तिकिटे दिली. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तयारी करत असलेल्या भाजपतील पदाधिकाऱ्यांना डावलले गेले. पक्षाकडून डावलण्यात आल्याने अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली.


अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष, तर काहींनी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. २० उमेदवारांसह ५४ जणांना भाजपाने पक्षातून बडतर्फ केले आहे. यात माजी महापौरांचाही समावेश आहे.
या संदर्भात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे ही गंभीर पक्षशिस्तभंगाची बाब आहे. त्यामुळे संबंधितांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.”
भाजपकडून ५४ जणांची हकालपट्टी
या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे व कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे. रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदीनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे.
अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, रतन काळे, ऋषीकेश आहेर, ऋषीकेश डापसे, शीतल साळवे, एकनाथ नवले, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे यांचा समावेश आहे.