यंदाच्या दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

0

नवी दिल्ली । भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर सलग १२व्यांदा तिरंगा फडकवून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वीच देशवासियांना मोठी गुडन्यूज दिली आहे. यंदाच्या दिवाळीला जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याची माहिती दिली. यातून सामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचं मोदी म्हणाले.

“मी यंदा तुमच्या सर्वांची दिवाळी डबल दिवाळी करण्याचे काम करणार आहे. यंदाच्या दिवाळीला सर्वात मोठे गिफ्ट मी देशातील जनतेला देणार आहे. गेल्या ८ वर्षात आपण जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. पूर्ण देशभरातील करांमध्ये कपात केली. करांमध्ये सुधारणा केली. आता ८ वर्षांनी काळाची गरज आहे की आम्ही हे रिव्ह्यूव करावे. यानंतर आम्ही एका उच्चस्तरीय समिती स्थापित केली. त्यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य सरकारसोबतही चर्चा केली आणि आता आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणत आहोत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

“हे नवीन जीएसटी रिफॉर्म्स यंदाच्या दिवाळीपूर्वी ही तुमच्यासाठी एक भेट असणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांसाठीचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे जीएसटीचे दर कमी होतील. याचा सर्वाधिक उपयोग लघू उद्योग, मध्यम उद्योगांना होईल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.