मुंबई विद्यापठाचा अनागोंदी कारभार
मुंबई | तक्रारदार वैभव गायकवाड मागासवर्गीय अधिकार कृती समिती सचिव यांनी १३/०२/२०२४ रोजी यांच्या ना.ग.आचार्य आणि दा. कु. मराठे महाविद्यालयात प्राचार्या डॉ विद्यागौरी लेले ह्या १९९५ पासून ते आता पर्यंत शिक्षक पासून ते प्राचार्या यांच्या २७ वर्षाच्या प्रवासात शासनाची फसवणूक करून खाजगी व्यवसाय करीत आहे तक्रार पुराव्यानिशी प्रधान सचिव उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, संचालक उच्च शिक्षण पुणे आणि सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभागाकडे दाखल केली. त्या नंतर तक्रारदार यांनी वारंवार महाराष्ट्र शासन,श्री. विकास रस्तोगी सर प्रधान सचिव उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, प्रभारी संचालक मा.शैलेंद्र देवळांकर आणि मा.हरिभाऊ शिंदे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मुंबई यांना वारंवार १३/०२/२०२४ पासून आतापर्यंत पत्रा द्वारे कळविले आहे.
मुंबई विद्यापीठाला मागील ०३ महिन्यांपासून नियम आणि नियमतील तरतुदीनुसार कार्यवाही पर अहवाल संचालक आणि सहसंचालक उच्च शिक्षण विभाग सादर करण्यासाठी पत्रा द्वारे ०३ वेळा कळवून देखील,महाराष्ट्र शासनाची वारंवार फसवणूक करणाऱ्या प्राचार्या विद्यागौरी लेले यांच्या मागे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव ऊभे राहुन जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना साथ देत आहे असे तक्रार दराचे मत आहे.या उलट तक्रारिवर कारवाई न करता तक्रार दाराला मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून दबाव पत्रे येत आहे.अश्या प्रकारे शासनाची फसवणूक करण्याची प्रवृत्ती जर बळावली तर ती शासकीय कामकाजाला बाधत आहे आणि लोकशाही ला घातक आहे. असे तक्रार दराचे म्हणणे आहे.
त्यात फक्त मुंबई विद्यापीठाच्या कार्यशैथिलते मुळे योग्य प्रकारे कारवाई झाली नाही तर मागासवर्गीय अधिकार कृती समिती यांच्या वतीने मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.,असे तक्रार दार यांचे मत आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड आणि उच्च शिक्षण संचालक प्रभारी शैलेंद्र देवळांकर आणि सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग हरिभाऊ शिंदे यांना कळवून देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही.