मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोट; आरोपींची फाशी रद्द, १२ जणांची निर्दोष सुटका, कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय
मुंबई । मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
या प्रकरणातील १२ जणांना दोषी ठरवणारा विशेष मकोका न्यायालयाचा ३० सप्टेंबर २०१५ चा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. विशेष न्यायालयाने यातील पाच दोषींना मृत्युदंड आणि उर्वरित ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर जवळपास एक दशकानंतर उच्च न्यायालयाने सर्व १२ जणांची निर्दोष सुटका केली.
11 जुलै 2006 रोजी माटुंगा आणि मीरा रोडदरम्यान साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या भीषण बॉम्बस्फोटात 160 जणांनी आपले प्राण गमावले होते. पाकिस्तानच्या ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेनं हा कट रचला होता. दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवले होते. मकोकाच्या विशेष न्यायालयाने 2015 मध्ये 12 जणांना शिक्षा सुनावली होती.
५ जणांना मृत्युदंड आणि ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर, राज्य सरकारने मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर आरोपींनी त्यांच्या शिक्षेला आणि शिक्षेला आव्हान देत अपील दाखल केले. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सर्व १२ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.