जळगावात खळबळ ! दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला
जळगाव । जळगाव शहरात आज दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली असून महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून ते जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बॅनर छापण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुपारच्या सुमारास टोळक्याच्या जमावाने अचानक हल्ला चढवत सपकाळे यांच्या गाडीवर दगडफेक आणि तोडफोड केली. त्यानंतर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला.


या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात मुकुंद सपकाळे किरकोळ जखमी झाले असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.