मुक्ताई प्राथमिक शाळेत शिक्षक दिवस मुलांनी केला उत्साहात साजरा
जळगाव: येथील मुक्ताई प्राथमिक शाळेत 5 सप्टेंबर शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे कवी प्रकाश पाटील, मुख्या.अमोल कोल्हे,सौ.सविता पाटील यांची उपस्थिती होती. प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेस माल्यार्पण केले.अमोल कोल्हे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.
रूपाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट मुलांना सांगीतला व “मी शिक्षक बोलतो” ही कविता सादर करून मुलांचे मनोरंजन केले.. यावेळी विद्यार्थी शिक्षीका जानवी वाघ, पूर्वा सपकाळे, साई पवार, नक्ष महाले व देव जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गावित यांनी केले मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थी- शिक्षक व शिक्षकाला पेन देऊन स्वागत केले.शिक्षक अविनाश सरदार आभार प्रदर्शन केले.शेवटी सर्व मुलांना चॉकलेट वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…