हिंगोली जिल्ह्याचा सिंचन व विज अनुशेष प्रश्न बाबत आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली, हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष 2017 साली परभणी जिल्ह्यातून वेगळा करून मान्य करण्यात आला होता, त्या अनुषंगाने बऱ्याच प्रमाणात सिंचनाची कामे झाली परंतु बरीच कामे कर्मचाऱ्यांचा अभावामुळे बंद पडत आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी केली.
त्यावेळी सोबतच सिंचन विहरी 22000 करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण कार्यालय पुणे यांनी अभिप्राय दिला होता.परंतु प्रत्यक्षात फक्त 5000 विहिरी पूर्ण झाल्या आहेत. त्याच बरोबर सिंचन वाढल्यामुळे विजेचाही तुटवडा भासत आहे. या विजेची अनेक केंद्रे मंजूर करून द्यावी अशी मागणी यावेळी केली.यावेळी सोबत शहराध्यक्ष कैलास काबरा,नगरसेवक राजू गोटे व हमीद प्यारेवाले उपस्थित होते. हिंगोली प्रतिनिधी दिलीप गायकवाड