शिक्षक उद्याचा सक्षम नागरिक घडवण्याचे कार्य ; आमदार शिरीष चौधरी
फैजपुर |
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून भारताचा उद्याचा सक्षम नागरिक घडवण्याचे चांगले कार्य शिक्षक करत असतात.त्यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.असे
प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
मधु स्नेह परिवार खिरोदा तर्फे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना संस्कार गीताचे पुस्तके देण्यात आले तसेच सर्व शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतरांचा शान पेन संस्कार गीताचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष निळकंठ रामदास फिरके होते. प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाचपांडे यांनी केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे ,अक्षय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील फिरके ,माजी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, प्रा. सतीश चौधरी, प्रा. आर.पी चौधरी, उदळी हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय एल पाटील, चिनावलचे माजी सरपंच बापू पाटील, गोटू नेमाडे उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे, माधुरी चौधरी, भुवनेश्वर भिरूड, प्रवीण वारके, गजानन सुरवाडे, विजय वारके ,किशोर ब-हाटे ,सुनील भोळे,लक्ष्मण पाटील उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलीमा भोळे यांनी तर आभार नरेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून आमदार शिरीष चौधरी यांनी संस्कार गीते या पुस्तकातील देह मंदिर चित्त मंदिर हे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.