शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटीलांना अटक

0

मुक्ताईनगर । इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणावरून खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांचे सुरु असलेलं आंदोलन आज (मंगळवार) अधिकच चिघळले असून या आंदोलनात सहभागी झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले आहे. दरम्यान आमदारांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

गेल्या अनेक महिन्यांपासून इंदूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. दरम्यान, यात खामखेडा येथील शेतकऱ्यांना भूमी अधिग्रणाचा योग्य मोबदला न मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील देखील सहभागी झाले होते.

दरम्यान, वातावरण चिघळल्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसह आमदार पाटील यांना अटक केली असून, त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ बाजार पोलीस स्थानकात आणले जात असल्याचे वृत्त आहे.

दरम्यन, काही दिवसांपूर्वी या कामाच्या ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या केळीमध्ये जेसीबी घालून ते पीक जमीनदोस्त केली आणि काम सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती. यानंतर देखील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते.

Leave A Reply

Your email address will not be published.