राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे अध्यक्ष यांची आमदार आमशा पाडवींनी घेतली भेट

0

अक्कलकुवा (वार्ताहर) | राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष (केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा) .अंतरसिंग आर्य यांनी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी लोकप्रतिनिधी व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य, लोकनेते, लोकप्रिय आमदार .आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या विविध समस्या मांडल्या तसेच छोटी बिंदु नामावली, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, रखडलेली पेसा भरती आदिवासींच्या जमिनी, वन पट्टे धारकांवर होत असलेला अन्याय याबाबत विस्तुत माहिती देत आवश्यक ते पुरावे दिले व यावर आयोगाने कार्यवाही करावी अशी मागणी केली. त्या नुसार अनुसुचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले

Leave A Reply

Your email address will not be published.