मराठी चित्रपट महामंडळा मार्फत दीड दिवसीय माघी गणरायाचे आगमन

0

सालाबादा प्रमाणे या ही वर्षी नवीन वर्षाच्या फेब्रुवारी आगमना सोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन झाले. सर्व कार्यांचा सफल श्री गणेशा जेथून होतो ते आराध्य दैवत,वक्रतुंड महाकाय गणरायाची सर्वप्रथम मंडळातील महिला व पुरुष सभासदांच्या हस्ते स्तुती आराधना करण्यात आली. मंडळाचे विश्वस्त आदरणीय हेमंत जी परब साहेब यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि कलाकारांच्या सोबतच चित्रपट महामंडळाच्या वृंदा मधून ऑफिसचे क्रियाशील विश्वस्त म्हणून ओळखल्या जाणारे आदरणीय विशाल जी पवार साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी गणपती बाप्पांचे स्वागत केले. यावेळेस लेखक दिग्दर्शक गीतकार विशाल वाघ उपस्थित असून, येणाऱ्या चालू वर्षात आणि उर्वरित प्रत्येक वर्षामध्ये कलावंतांचे भाग्य उज्वल बनावं तसच नवीन कलावंतांना चित्रपट महामंडळामध्ये प्रगतीचे रस्ते सुकर व्हावेत या आकांक्षा, श्री गणेशा पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.