मनोज जरांगेंचं आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित ; कारणही सांगितले

0

आंतरवाली सराटी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. मात्र, त्यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याचे सांगितले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

उपोषण स्थगित करत असताना त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना जरांगे यांनी, “मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असे म्हटले. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं” असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडून राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे पुढे म्हणाले.

सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनीमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.