मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0

मालेगाव । मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. याप्रकरणात मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नसल्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. दरम्यान, घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरसह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावरही आरोप होते.

आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.