माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा महायुतीला पाठिंबा
जळगाव । येत्या दोन दिवसाने म्हणजेच १३ मे रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मात्र यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिनांक 12 रोजी जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, जळगाव जिल्हावासियांना सुरेशदादा जैन यांनी एक पत्र लिहलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्हावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्हाच्या विकासासाठी आपले बहुमुल्य मत जळगाव मतदार संघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन मोदीजीचे विकसीत भारत घडविण्यासाठी हात बळकट करुया असे.
दरम्यान सुरेशदादा जैन यांच्या निवास्थानी भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन, आ. राजुमामा भोळे, उमेदवार स्मिता वाघ, जि. प. सदस्य प्रताप पवार यांची उपस्थिती होती.