जळगावसह राज्यातील २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

0
जळगाव/मुंबई । जळगावसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली नव्हती. महापौरपद कुणासाठी राखीव सुटणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर आज २२ जानेवारी रोजी राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. त्यानुसार जळगावचे महापौरपद हे ओबीसी महिला साठी राखीव निघाले असून आता या पदावर नेमके कोण विराजमान होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-
अनुसूचित जमाती – 1
अनुसूचित जाती – 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
सर्वसाधारण – 17
महापालिकांसाठी कुठे कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?
1. नवी मुंबई: सर्वसाधारण
2. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
Leave A Reply

Your email address will not be published.