एलपीजी गॅस सिलिंडर ६० रूपयांनी महागला
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी महागल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती ११५ रुपयांनी वाढल्या आहेत. आता इंडियन ऑइलने वेबसाइटवर गॅसचे नवीन दर अपडेट केले आहेत.
१४.२ किलोच्या घरगुती गॅसच्या किंमतीत ६० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सिलिंडरची किंमत ८५२.५० रुपयांवरुन ९१२.५० रुपये झाली आहे. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमत ८७९ रुपयांवरुन वाढून ९३९ रुपये झाली आहे. चेन्नईत हे दर ८६८.५० रुपयांवरुन वाढून ९२८.५० रुपये झाले आहेत.


दुसरीकडे व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ११५ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १८८३ रुपये झाली आहे. मुंबईत कमर्शियल गॅस १८३ रुपयांना मिळतो. कोलकत्ता येथे गॅसची किंमत १८७.५० रुपयांवरुन वाढून १९९० रुपये झाली आहे.चेन्नईत १९ किलो वजनाच्या गॅसची किंमती २०४३.५० रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस हे हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टोअरमध्ये वापरला जातो.