जळगावात ठाकरे गटाला धक्का! स्मिता वाघ यांची विजयाकडे वाटचाल
जळगाव । लोकसभा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जवळपास पाऊणे दोन लाख मतांची आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
जळगाव लोकसभेमध्ये महायुती भाजपा उमेदवार स्मिता वाघ व महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होत आहे. मतमोजणी सुरु असून १७-१८ फेरीअंती तब्बल जवळपास पाऊणे दोन लाख मतांनी स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे. जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना ५,१०,४७२ मते मिळाली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार करण पवार पाटील यांना ३ लाख १४ हजार ६७० मते मिळालेली आहे.
दरम्यान स्मिताताई वाघ यांनी मोठी लीड घेतल्याने जळगाव येथील भाजप कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष सुरू केलायं, याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज व कार्यकर्ते उपस्थित होते